नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतरासाठी बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग
फरार महिला आरोपींसह आतापर्यंत 6आरोपींना अटक नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच अत्याचारग्रस्त महिलांवर धर्मांतरासाठी मानसिक दबाव टाकल्य
अत्याचार लोगो


फरार महिला आरोपींसह आतापर्यंत 6आरोपींना अटक

नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच अत्याचारग्रस्त महिलांवर धर्मांतरासाठी मानसिक दबाव टाकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. कंपनीत सुरू असलेल्या या अत्याचार जिहाद प्रकरणी 8 महिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, 8 गुन्ह्यांत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन महिला आरोपी फरार आहेत.

नाशिक पोलिसांनी तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलिसांनुसार, 2022 पासून या कंपनीत दोन विवाहित महिलांसह 6 तरुणींवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. यामध्ये एका युवकाची तक्रारही समाविष्ट आहे, ज्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आले होता.

याप्रकरणी पोलिसांनी असिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार, दानिश शेख, निदा खान या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोन महिला आरोपी अजूनही फरार आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या कंपनीतील अत्याचारग्रस्त महिलांनी आधी संचालकांकडे तक्रार केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला. पीडित महिलांनी धाडस दाखवत पोलिसांना आपली आपबीती सांगितली आणि लैंगिक शोषण, मानसिक अत्याचार तसेच धर्मांतरासाठी होणाऱ्या दबावाचे वर्णन केले.

या प्रकरणामुळे नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शहरातील नागरिक आणि कर्मचारी कंपन्यांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. प्रशासनाकडून कंपनीचे नाव अद्याप उघड केलेले नाही, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रावर संभाव्य नकारात्मक परिणाम होऊ शकतो.या प्रकरणाचा तपास पोलीस उपयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande