नांदेड - सोनू कल्याणकर खून प्रकरणांत रिंदा गँगचा हात, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहरातील श्रीनगर येथील सोनू कल्याणकर यांच्या खूनाशी रिंदा गँगचा संबंध असल्याचे उघड झाले असून सोनू कल्याणकर यांच्या हत्येत रिंदा गँगचा म्होरक्या यांचा संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सदरील खून बहि
नांदेड - सोनू कल्याणकर खून प्रकरणांत रिंदा गँगचा हात, आरोपींविरोधात गुन्हा दाखल


नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)।

नांदेड शहरातील श्रीनगर येथील सोनू कल्याणकर यांच्या खूनाशी रिंदा गँगचा संबंध असल्याचे उघड झाले असून सोनू कल्याणकर यांच्या हत्येत रिंदा गँगचा म्होरक्या यांचा संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सदरील खून बहिणीच्या लग्न मोडल्याने हा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान सोनू कल्याणकर खुन प्रकरणात पाच आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच श्रीनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर पडलेल्या अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर (वय ३५) या तरुणावर काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याचा दुर्दैवी अंत केला. सुरुवातीला हा हल्ला केवळ जुन्या वादातून झाल्याचे वाटत होते. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून ही घटना एका प्रेमप्रकरणातून आणि सोयरीक मोडल्याच्या रागातून घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात मृताचे वडील अशोक कल्याणकर यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, रिंदा टोळीचा सक्रिय सदस्य हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande