
नवी दिल्ली, 09 एप्रिल (हिं.स.) : अमेरिका-इराण युद्ध आणि वाढत्या एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन फ्यूल) किंमतींमुळे एअरलाइन्सना दिलासा देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. घरगुती उड्डाणांसाठी लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 3 महिन्यांसाठी 25 टक्के कपात केली जाणार आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व 34 प्रमुख विमानतळांना यासंदर्भात सूचना दिली आहे.
एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीने (एईआरए) मंगळवारी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि इतर विमानतळांवर कार्यरत संचालकांना शुल्क कपातीसंदर्भा तत्काळ आदेश दिला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने, विमानन मंत्रालय घरगुती विमान भाड्यात अनियंत्रित वाढ होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या महिन्यात घरगुती एटीएफच्या किमतींमध्ये जास्तीत जास्त 25 टक्के वाढ करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मंत्रालयाने विमानतळाच्या शुल्कांमध्ये दुर्लभ हस्तक्षेप केला असून, आदेशात असे सांगितले आहे.
सर्व प्रमुख विमानतळांवर लँडिंग आणि पार्किंग शुल्क (एरोनॉटिकल टॅरिफचा भाग) विद्यमान टॅरिफच्या तुलनेत 25 टक्के कमी केली जाईल. ही कपात तत्काळ प्रभावी होईल आणि आगामी 3 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्व घरगुती उड्डाणांवर लागू होईल. तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हा निर्णय पुन्हा पुनरावलोकन केला जाईल. एकूण महसुली गरजेतून झालेल्या कोणत्याही कम वसुलीस पुढील नियंत्रण कालावधीत टॅरिफ ठरवताना समायोजित केले जाईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एव्हिएशन टर्बाइन फ्यूलची बेस किंमत अनुक्रमे 25 टक्के आणि 100 टक्क्यांहून अधिक वाढवली आहे. एअर इंडिया ग्रुप आणि इंडिगो यांनी आपले फ्यूल सरचार्ज वाढवले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी