
तिरुवनंतपुरम, 09 एप्रिल, (हिं.स.)आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदान शांततेत सुरू आहे. लोक मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थित राहत आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाचा माजी गोलकीपर पी. आर. श्रीजेशने गुरुवारी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले.तर भारतीय क्रिकेटपटू रियान परागने गुवाहाटीमध्ये मतदान केले. मतदान केल्यानंतर श्रीजेशने शाई लावलेले बोट दाखवले. त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. श्रीजेशने आपल्या कुटुंबासोबत मतदान केले आणि लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतला. केरळमधील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे.
पी. आर. श्रीजेशने मतदान केल्यानंतर आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला. त्याने त्याला कॅप्शन दिले, माझे मत, माझा आवाज, माझी जबाबदारी. मी केले, तुम्ही केले का?
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनेही गुवाहाटीतील एका मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. रियानने गुवाहाटीच्या खरगुली येथील लाल सिंग अकादमी मतदान केंद्रावर मतदान केले.
आसाम, केरळ आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या तीन प्रदेशांमधील एकूण २९६ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यासोबतच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये निश्चित होणार आहे. आसाममध्ये १२६, केरळमध्ये १४० आणि पुदुचेरीमध्ये ३० जागांवर मतदान होत आहे. आसाममधील १२६ जागांसाठी ७२२ उमेदवार निवडणूक लढवत असून बहुमताचा आकडा ६४ आहे. मतमोजणी ४ मे रोजी होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे