अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाचा हातोडा
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने मौजे कोंडी आणि बीबी दारफळ परिसरात धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाई
sfdgsdfg


सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने मौजे कोंडी आणि बीबी दारफळ परिसरात धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध उत्खनन आणि वाहतूक करणारे ६ हायवा ट्रक आणि १ पोकलॅण्ड मशीन जप्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्याभरात अवैध उत्खनन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत तहसीलदार निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली. कोंडी आणि बीबी दारफळ परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या धाडीदरम्यान पकडण्यात आलेली सर्व वाहने जप्त करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाहनांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असून, या कारवाईमुळे अवैध वाळू आणि खडी माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande