
नवी दिल्ली , 01 मे (हिं.स.)।नोएडा इंटरनॅशनल विमानतळ ने शुक्रवारी अधिकृत घोषणा करत सांगितले की येथे १५ जून २०२६ पासून व्यावसायिक हवाई सेवा सुरू होणार आहेत. पहिली कमर्शियल उड्डाण इंडिगो एअरलाईन्स द्वारे चालवली जाईल. त्यानंतर लगेचच अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस देखील आपल्या सेवा सुरू करतील. त्यामुळेच विमानतळ प्रशासन जूनच्या मध्यापर्यंत उड्डाणे सुरू होण्याची माहिती देत आहे.
दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतातील प्रवाशांना या विमानतळावरून प्रवासी सेवांसोबतच कार्गो (मालवाहतूक) सुविधाही उपलब्ध होणार आहेत.विविध शहरांसाठीच्या उड्डाणांची वेळापत्रक, गंतव्यस्थाने आणि प्रवासी सेवांबाबतची सविस्तर माहिती विमानतळ प्राधिकरण आणि एअरलाईनलवकरच करणार आहेत.
एअरलाईन्स कंपन्यांनी सुरुवातीला या विमानतळावरून १७ उड्डाणे सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आता तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेलाही अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२८ मार्च रोजी या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर येथे लवकरच देशांतर्गत आणि कार्गो सेवा सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.नागरिक उड्डयन सुरक्षा ब्युरो कडून हवाई अड्डा सुरक्षा कार्यक्रम (एएसपी)ला मंजुरी मिळाल्यानंतर यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ने १५ जूनपासून उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्यावसायिक सेवांच्या प्रारंभापूर्वी विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, प्रणाली आणि कार्यप्रणाली नियामक निकषांनुसार पूर्ण करण्यात आली आहे.
नोएडा विमानतळ आधुनिक टर्मिनल, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम संचालन आणि मजबूत मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीचा संगम आहे. व्यावसायिक उड्डाणे सुरू झाल्याने प्रादेशिक संपर्क वाढेल, आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि पर्यटन, व्यापार तसेच गुंतवणुकीसाठी नवे संधी निर्माण होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode