मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पिकअपची ट्रकला धडक
रायगड, 01 मे (हिं.स.)। : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव पिकअपने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी खालापूर तालुक्यातील आडोशी गाव हद्दीत पुणे लेनवरील कि.मी. ४१/२०० जव
Pickup hits truck on Mumbai-Pune Expressway


रायगड, 01 मे (हिं.स.)। : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव पिकअपने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी खालापूर तालुक्यातील आडोशी गाव हद्दीत पुणे लेनवरील कि.मी. ४१/२०० जवळ घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन क्र. एमएच.४६/बीयू/८३२४ हे वाहन अतिवेगाने व हयगयीने चालवत होता. दरम्यान समोरून जाणाऱ्या ट्रक क्र. एमएच.०९/एफएल/४०३४ यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात चालकास किरकोळ दुखापत झाली असून गणेश पोपट पवार (वय २१) याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. तसेच पिकअप वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुरनं. १४९/२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माधवी सावंत करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande