महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन
ठाणे, 01 मे, (हिं.स.)। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या वतीने आज संपूर्ण राज्यभर राजा शिवाजी” या चित्रपटाच्या मोफत विशेष प्रदर्शनाचे भव्य आणि उत्स्फूर्त वातावरणात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ चित्रपटगृहा
ठाणे


ठाणे, 01 मे, (हिं.स.)। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या वतीने आज संपूर्ण राज्यभर राजा शिवाजी” या चित्रपटाच्या मोफत विशेष प्रदर्शनाचे भव्य आणि उत्स्फूर्त वातावरणात आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ चित्रपटगृहांमध्ये हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, राज्यभर या उपक्रमाला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून, कल्याण लोकसभेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष मा. पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

ठाणे येथील विवियाना मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनासाठी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक हे स्वतः उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवून शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, ठिकठिकाणी तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य विचारांचा जागर समाजात अधिक प्रभावीपणे व्हावा, तसेच तरुण पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडण्याच्या उद्देशाने या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष मा. पुर्वेश सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. तळागाळातील शिवसैनिक वर्षभर कार्यरत असतात; त्यांच्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त ही एक छोटीशी भेट आहे. मराठी चित्रपट पुढे यावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात पोहोचावा, या हेतूने आम्ही हा प्रयत्न केला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, ही आमची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande