हिमंत बिस्व सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
गुवाहाटी, 12 मे (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंगळवारी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटी येथील खानापारा स्थि
Himanta Sarma Oath CM ASSAM


Himanta Sarma Oath CM ASSAM


Himanta Sarma Oath CM ASSAM


गुवाहाटी, 12 मे (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंगळवारी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

गुवाहाटी येथील खानापारा स्थित वेटरनरी कॉलेज क्रीडांगणावर आयोजित भव्य समारंभात डॉ. सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (राजग) शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.डॉ. सरमा यांच्या शपथविधीनंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, आसाम गण परिषद (अगप)चे अतुल बोरा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)चे चरण बोडो यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, हिमंत बिस्व सरमा यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, अत्यंत विनम्रतेने मी आसामच्या जनतेला वंदन करतो. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे, कारण मी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाने आमच्या सरकारला सर्वात मोठी प्रेरणा मिळाली आहे. सेवा आणि समर्पणाच्या मार्गावर चालताना त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीच आमच्यासाठी दिशादर्शक ठरली आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वामुळे आसाममधील सर्व एनडीए कार्यकर्त्यांना आमच्या सुशासनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळाली.

पुढे ते म्हणाले की, आजचा हा सोहळा आदरणीय अमित शाह यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाला नसता. राज्यात शांतता आणि समृद्धी परत आणण्यासाठी तसेच जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या आमच्या प्रवासात ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. आणि शेवटी, आसामभरातील प्रत्येक कार्यकर्त्याचे विशेष आभार, ज्यांनी या ऐतिहासिक विजयासाठी अथक परिश्रम घेतले. विकसित आसामचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आम्ही निरंतर काम करत राहू.आसाम विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये राजगने शानदार कामगिरी करत १२६ सदस्यीय विधानसभेत १०२ जागांवर विजय मिळवला. यामध्ये भारतीय जनता पक्षाला ८२ जागा मिळाल्या, तर सहयोगी पक्षांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande