सुप्रीम कोर्टाकडून टीव्हीके आमदार सेतुपतींना दिलासा; मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती
नवी दिल्ली, 13 मे (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष तमिळगा वेत्री कडगम (टीव्हीके) चे आमदार सिनीवासा सेतुपती यांना विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करण्यास रोखण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आ
TVK MLA SC Stay Madras HC Order


नवी दिल्ली, 13 मे (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष तमिळगा वेत्री कडगम (टीव्हीके) चे आमदार सिनीवासा सेतुपती यांना विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करण्यास रोखण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयातील कार्यवाहीवरही स्थगिती दिली आहे.

सिनीवासा सेतुपती यांच्या निवडणुकीला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सेतुपती यांचा विजय अवघ्या एका मताने झाला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये त्यांनी तिरुपत्तूर मतदारसंघातून एका मताने विजय मिळवला होता. सेतुपती यांच्या निवडणुकीविरोधात द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे उमेदवार के. आर. पेरियाकरुप्पन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पेरियाकरुप्पन यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका पोस्टल बॅलेटची मतमोजणी करण्यात आली नाही, कारण ते दुसऱ्या विधानसभा मतदारसंघासाठी पाठवण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande