
नांदेड, 13 मे (हिं.स.)। मुखेड शहराचे आराध्य दैवत आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत वीरभद्र स्वामी यांच्या मंदिराच्या सुरू असलेल्या भव्य विकासकामांची आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली.
स्वामींचे हे पावन मंदिर केवळ एक वास्तू नसून आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे जागृत शक्तीपीठ आहे. या मंदिराचा परिसर अधिक भव्य-दिव्य व्हावा आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्वोत्कृष्ट सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आजच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी आणि अभियंत्यांसोबत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत व प्रगतीबाबत सविस्तर तांत्रिक चर्चा केली. तसेच सर्व कामे दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
या पाहणी दरम्यान प्रामुख्याने खालील बाबींवर भर दिला :-
सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेची तांत्रिकदृष्ट्या प्रत्यक्ष पडताळणी करून कामाचा दर्जा तपासून पाहिला.
भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि निवासासाठी आवश्यक असलेल्या भक्तनिवास व इतर सोयी-सुविधांच्या कामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
सर्व विकासकामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis