एन. रंगस्वामी बनले पाचव्यांदा पुडुचेरीचे मुख्यमंत्री
नवी दिल्ली , 13 मे (हिं.स.)।एन. रंगास्वामी यांनी बुधवारी पुडुचेरीचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी के. कैलाशनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन उपस्थित होते. एन. रंग
एन. रंगस्वामी यांनी पुडुचेरीचेच्या मुख्यमंत्रीपदी घेतली शपथ


नवी दिल्ली , 13 मे (हिं.स.)।एन. रंगास्वामी यांनी बुधवारी पुडुचेरीचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी के. कैलाशनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन उपस्थित होते. एन. रंगास्वामी हे ऑल इंडिया एनआर काँग्रेस (AINRC) चे संस्थापक असून राज्यात भाजपसोबत त्यांची युती आहे.

समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी पाचव्यांदा निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि नव्या एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “जनतेच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबवणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू.” ते पुढे म्हणाले, “आम्ही पुडुचेरीचा विकास सिंगापूरप्रमाणे करण्याचा संकल्प केला आहे.”

दरम्यान, शपथविधी समारंभात भाजप नेते ए. नमस्सिवयम यांनीही पुडुचेरी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी सांगितले, “आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत आणि सर्व विद्यमान योजना सुरू राहतील. त्याचबरोबर नव्या योजनाही सुरू केल्या जातील. आम्ही पुडुचेरीचा सर्वांगीण विकास करू.” ते पुढे म्हणाले, “मी चौथ्यांदा पदभार स्वीकारत आहे. खात्यांचे वाटप या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात होईल. भारत सरकार विविध योजनांमध्ये आम्हाला सहकार्य करत आहे. त्यामुळे सुविधा आणि पर्यटन क्षेत्राचा विकास आपोआप होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी आमदार शपथ घेतील की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. तसेच एआयएनआरसी नेते मल्लादी कृष्ण राव यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल.”

४ मे रोजी जाहीर झालेल्या पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ निकालांमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) ने पुडुचेरीत सत्ता कायम राखली. ३० सदस्यीय पुडुचेरी विधानसभेत एनआर काँग्रेसने १२ जागा, भाजपने ४ जागा आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयडीएमके) ने १ जागा जिंकली. तर द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) ला ५ जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला १ जागा मिळाली. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने तमिळनाडूमधील दमदार सुरुवातीनंतर पुडुचेरीतही खाते उघडत २ जागा जिंकल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande