आयपीएल 2026 : पॅट कमिन्सला षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड
अहमदाबाद, 13 मे (हिं.स.)सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्सकडून ८२ धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर, गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल बीसीसीआयने कर्णधार पॅट कमिन्सला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आयपीएल आचारसंहितेच्या कल
पॅट कमिन्स


अहमदाबाद, 13 मे (हिं.स.)सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्सकडून ८२ धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर, गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल बीसीसीआयने कर्णधार पॅट कमिन्सला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत पॅट कमिन्सचा हा पहिलाच गुन्हा होता, ज्यामुळे त्याला 12 लाख रुपयांचा दंड झाला.

आयपीएल २०२६ च्या सामन्यांदरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल अनेक कर्णधारांना आयसीसी आणि बीसीसीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पॅट कमिन्सच्या आधी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांना त्यांच्या संघांनी निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला गुजरात टायटन्सविरुद्धच्या ५६ व्या सामन्यात षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. हैदराबादचा या हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, ज्यामुळे त्याला १2 लाख रुपयांचा दंड झाला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत ५ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादचा संघ १४.५ षटकांत ८६ धावांवर सर्वबाद झाला. सामना जिंकल्यानंतर गुजरातने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर पराभव होऊनही हैदराबाद तिसऱ्या स्थानावर कायम राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande