
अमरावती, 16 मे (हिं.स.)
रेल्वेस्थानकावरील वेटींग रुममधून प्रवाशांचे मोबाईल चोरीकरणाऱ्यास रेल्वे गुन्हेशाखा व आरपीएफच्या मदतीने एकास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचे पाच हॅन्डसेट जप्त केले आहे. शेख जावेद उर्फ दत्तू शेख शब्बीर (वय ३२, रा. लालखडी, अमरावती) असे अटक संशयिताचे नाव असल्याची माहिती रेल्वेच्या पोलिस निरीक्षक अर्चना गावडे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी बडनेरा रेल्वेस्थानकाचे वेटिंग रुमच्या हॉलमधुन मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले असता, त्यात संशयित शेख जावेद उर्फ दत्तू हा सहभागी असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्याआधारे संशयितास अटक करण्यात आली. संशयिताकडून दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन मोबाईलसह अन्य तीन असे एकूण पाच मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले. जप्त मोबाईल ५६ हजारांचे आहेत. संशयितास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जीआरपीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना गाडवे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे राहुल हिरोडे, शरद जुनघरे, राजू गाढवे, प्रदीप घोडकर, शरद कवळकर, सागर पेटे, लोहमार्ग नागपूरचे सागर खंडारे, आरपीएफचे सागर पकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी