
लातूर, 17 मे (हिं.स.)।
नागपूर महालेखाकार कार्यालय आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २५ मे रोजी 'पेंशन अदालत' (निवृत्तीवेतन सभा) चे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत सकाळी ११ वाजता लातूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या डीपीडीसी हॉलमध्ये पार पडणार आहे. या पेंशन अदालतीमध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणी व प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करून त्यांचे निवारण करण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, शासकीय अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व निवृत्तीवेतनधारक (पेन्शनर्स) यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. संबंधितांनी २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वर नमूद केलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरच्या जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी कळविले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis