
रत्नागिरी, 17 मे (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विजेचे खांब हलविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने सोमवारी, दि. १८ मे २०२६ रोजी संगमेश्वर शहर आणि परिसरातील वीजपुरवठा सात तास खंडित राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
महावितरणच्या माहितीनुसार सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये संगमेश्वर बस स्टँड परिसर, संगमेश्वर शहर, असुर्डे तसेच कोंड-असुर्डे परिसराचा समावेश आहे.
महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. खांब हलविण्याचे काम नियोजित वेळेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यास वीजपुरवठा दुपारी ३ वाजण्यापूर्वीच पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी