महाडमध्ये जमावबंदी आदेश धाब्यावर; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
रायगड, 02 मे (हिं.स.)। महाड तालुक्यातील रावतळी बौद्धवाडी येथे महिलेला धमकी देणे, अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वा
Curfew order on hold; chaos in the night


रायगड, 02 मे (हिं.स.)। महाड तालुक्यातील रावतळी बौद्धवाडी येथे महिलेला धमकी देणे, अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ७ तसेच अन्य दोन अनोळखी आरोपी हे सर्व राजिवली (ता. महाड) येथील असून ते फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी “तुझा मुलगा कुठे आहे, त्याला घरात लपवून ठेवले आहे का?” असा जाब विचारत संबंधित युवकाला बाहेर काढण्याची मागणी केली. “तो बाहेर आला नाही तर जिथे भेटेल तिथे जिवे ठार मारू,” अशी धमकी देत आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून रावतळी गावात धिंगाणा घातला. फिर्यादी महिला तसेच साक्षीदारांना अश्लील शिवीगाळ करून महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या मुलाला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

दरम्यान, आरोपींनी एका साक्षीदाराच्या घरात घुसून त्याला काठीने मारहाण केली. इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रायगड यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हा प्रकार घडल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास स.फौ. देसाई करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande