
स्टॉकहोम, २ मे (हिं.स.)भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने टेपे सिगेमन अँड कंपनी बुद्धिबळ स्पर्धेत शानदार सुरुवात केली आणि पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. सामन्यादरम्यान, कार्लसनने क्वीन्साइडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुनने अचूक चाल खेळून धोका टाळला. त्यानंतर त्याने परिस्थिती सोपी करण्यासाठी आपला घोडा सक्रिय केला. हत्तींच्या अदलाबदलीनंतर, पांढऱ्या मोहऱ्यांसाठी विजयाचा कोणताही स्पष्ट मार्ग उरला नव्हता आणि सामना बरोबरीत सुटला.
२०२६ ची सुरुवात अर्जुन एरिगैसीसाठी खराब झाली. त्याने टाटा स्टील मास्टर्समध्ये १३ वे स्थान आणि कार्लसेनने जिंकलेल्या फिडे फ्रीस्टाइल बुद्धिबळ विश्वचॅम्पियनशिपमध्ये सहावे स्थान मिळवले.
ही स्पर्धा क्लासिकल बुद्धिबळातील सर्वात मजबूत स्पर्धांपैकी एक मानली जाते. २०२४ चा विजेता नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह, २०२१ चा चॅम्पियन जॉर्डन व्हॅन फोरेस्ट आणि स्वीडनचा नंबर १ बुद्धिबळपटू निल्स ग्रँडेलियस यांसारखे दिग्गज बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत. अर्जुनचा ड्रॉ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो, कारण तो जगातील अव्वल बुद्धिबळपटूविरुद्ध चांगला खेळला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे