
नवी दिल्ली, 02 मे (हिं.स.)सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. युवा गोलंदाज शिवम मावी मांडीच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी आर. एस. अँब्रिसला संघात स्थान दिले आहे.आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मावीच्या जागी, सनरायझर्स संघ व्यवस्थापनाने युवा अष्टपैलू आर. एस. अँब्रिसला संघात स्थान दिले आहे. चेन्नईस्थित अँब्रिस या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे झालेल्या आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाचा भाग होता. आणि तो स्पर्धेतील उत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून उदयास आला. अँब्रिसने ११ बळींसह भारताचा संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून स्पर्धा पूर्ण केली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे, भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून त्याला ओळख मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे