नीट पेपरफुटी-खरेदी प्रकरणात देशभरात किमान एक हजार पालक, विद्यार्थी कनेक्ट असावेत - सीबीआयचा अंदाज
लातूर, 21 मे (हिं.स.)। : नीट पेपरफुटी घोटाळ्यात पेपर खरेदीशी संबंध असलेले बहुतांश पालक आणि विद्यार्थी अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. मात्र सीबीआयच्या तपासाचा फोकस सध्या प्रकरणाशी संबंधीत कोचिंग क्लासेस व एजंटांपुरताच मर्यादित आहे. नीट परीक्षेच
नीट परीक्षा


सीबीआय


लातूर, 21 मे (हिं.स.)।

: नीट पेपरफुटी घोटाळ्यात पेपर खरेदीशी संबंध असलेले बहुतांश पालक आणि विद्यार्थी अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. मात्र सीबीआयच्या तपासाचा फोकस सध्या प्रकरणाशी संबंधीत कोचिंग क्लासेस व एजंटांपुरताच मर्यादित आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी व खरेदी प्रकरणात देशभरात किमान एक हजार पालक, विद्यार्थी कनेक्ट असावेत, असा सीबीआयचा अंदाज आहे. या पेपरफुटीचे लाभार्थी राजस्थानपासून दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये विखुरले आहे. त्यामुळे या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान सीबीआय पुढे आहे. सीबीआयने तपासासाठी सध्या केवळ कोचिंग क्लासेस आणि पेपर विक्री करणाऱ्या एजंटांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानंतर विद्यार्थी व पालक निशाण्यावर येतील.

देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रात मोठी धरपकड सुरू केली आहे. बुधवारी सीबीआयच्या पथकांनी पुणे आणि लातूरमध्ये एकाच वेळी एकाच वेळी धडक कारवाई केली. नीट पेपरफुटीच्या लातूर कनेक्शनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. शहरात प्रॅक्टिस करणारे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि डॉ. शिरूरे यांचे थेट आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार समोर आले आहेत. या संशयावरून सीबीआयचे पथक मंगळवारपासूनच डॉ. शिरूरे यांची कसून चौकशी करत होते.

पेपरफुटी प्रकरणात मराठवाड्यात नांदेड आणि लातूर या दोनच जिल्ह्यात सर्वाधिक पाणी मुरल्याचे दिसते. त्यामुळेच की काय या दोनच जिल्ह्यात सीबीआयचे पथक तळ ठोकून आहे. नीट पेपर लिक व खरेदी प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या कोचिंग क्लासेस, एजंट, समुपदेशक यांचा आधी सीबीआयकडून शोध घेतला जात आहे.

मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल गॅजेट्स सीबीआयने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या उपकरणांची न्यायवैद्यक तपासणी तातडीने सुरू करण्यात आली असून, डिलीट केलेला डेटा रिकव्हर करून आणखी मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. सीबीआय सध्या संशयित विद्याथ्यांचे आई-वडील, मित्र आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांची चौकशी करत आहे. दरम्यान, कारवाईची कुणकुण लागताच पुण्यातील काही संशयितांनी शहर सोडले असून, फरार संशयितांवर सीबीआय कडक पाळत ठेवून आहे. चौकशी झालेल्या सर्व व्यक्तींना तपासातील कोणतीही माहिती बाहेर न सांगण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे.

एवढ्या सर्व पालक व विद्यार्थ्यांना एकाचवेळी अटक करणे शक्य नाही. सीबीआयलाही अटकेची काही गडबड दिसत नाही. ज्याचा सहभाग जास्त त्याला अटक तर इतरांना साक्षीदार बनविले जाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआय तपास दीर्घकाळ चालणार आहे. पुरेशी संधी देणे, म्हणणे ऐकून घेणे, सर्व पुरावे मिळविणे, मगच अटकेची कारवाई करणे अशी सीबीआयची पद्धत आहे. सीबीआय आपल्यापर्यंत केव्हाही पोहचू शकते, याची जाणीव यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला

लातुरात आणखी 'बडे मासे' गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने बहुतांश पालक व विद्यार्थी भूमिगत झाले आहेत. सीबीआयला त्याची कल्पना आहे. मात्र, त्यांच्या अटकेची आत्ताच तेवढी घाई नाही. कुठेही भूमिगत झाले तरी सीबीआय त्यांच्यापर्यंत पोहचणारच आहे. त्यामुळे भूमिगत न होता गरज असेल तेव्हा सीबीआयला पालक विद्याथ्यांनी सहकार्य करावे, अशी सीबीआयची सध्याची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आता या रॅकेटची मुळे थेट लातूरपर्यंत पोहोचली आहे. सीबीआयच्या पोहोचल्याची चर्चा रंगली या धडक कारवाईनंतर लातूरमधील काही डॉक्टर, कोचिंग सर्किट आणि शिक्षण क्षेत्रातील तथाकथित बड्या नावांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कोणाचा नंबर लागणार? याचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande