
टियर 2-4 शहरांतील कुटुंबांना परवडणारे कव्हर
नागपूर, 21 मे (हिं.स.) : भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्सने टियर २, ३ आणि ४ शहरांतील नागरिकांसाठी परवडणारी नवी आरोग्य विमा योजना ‘व्हॅल्यू प्लस’ लाँच केली आहे.
या योजनेत ७.५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंतचे उच्च आरोग्य कव्हर उपलब्ध करून देण्यात आले असून, जवळपास २० टक्के कमी प्रीमियममध्ये हे संरक्षण देण्याचा दावा कंपनीने केला आहे. निवडक नेटवर्क रुग्णालयांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान शहरांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य संरक्षण अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. १८ वर्षांवरील प्रौढांसोबतच ९१ दिवस ते २५ वर्षांपर्यंतच्या आश्रित मुलांनाही या योजनेत कव्हर दिले जाणार आहे.
नागपूरमध्ये स्टार हेल्थची मजबूत उपस्थिती असून येथे १८३ नेटवर्क रुग्णालये उपलब्ध आहेत, ज्यापैकी १७३ रुग्णालये ‘व्हॅल्यू प्लस’ नेटवर्कमध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात कंपनीचे ८७ शाखांचे विस्तृत वितरण जाळे असून १.२३ लाखांहून अधिक एजंट कार्यरत आहेत.
कंपनीने राज्यात आतापर्यंत सुमारे ५०.२ लाख लोकांना विमा संरक्षण दिले असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २२९४.१ कोटी रुपयांचे ३,५८,०८० दावे निकाली काढले आहेत.
या लाँचबाबत मत व्यक्त करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आनंद रॉय म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून स्टार हेल्थने आरोग्य विमा अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनवण्याचे कार्य केले आहे. ‘व्हॅल्यू प्लस’च्या माध्यमातून टियर २, ३ आणि ४ शहरांतील अधिकाधिक कुटुंबांपर्यंत परवडणारे आणि दर्जेदार आरोग्य संरक्षण पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र बिझनेस हेड विजय अरोरा यांनीही या उत्पादनाला आधुनिक ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले असून वेलनेस आणि किफायतशीर प्रीमियम यांचा समतोल साधण्यात आल्याचे स्पष्ट केले.
‘व्हॅल्यू प्लस’ची प्रमुख वैशिष्ट्ये
या योजनेत १, २ आणि ३ वर्षांच्या पॉलिसी कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
७.५ लाख ते २५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
५ वर्षे क्लेम न केल्यास पहिल्या वर्षाचा संपूर्ण प्रीमियम परतावा
प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी ५० टक्के बोनस (कमाल १०० टक्क्यांपर्यंत)
सलग ७ क्लेम-फ्री वर्षांनंतर १०० टक्के अतिरिक्त विमा रक्कम (हेल्थ बूस्टर)
हॉस्पिटलायझेशन, डे-केअर, आयुष, होम केअर, अॅम्ब्युलन्स आणि इतर सुविधा
टेलिमेडिसिन, वेलनेस फायदे, दंत तपासणी व सेकंड ओपिनियन सुविधा
दीर्घकालीन पॉलिसीवर प्रीमियम सवलती (१० ते १२.३ टक्के)
महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वेलनेस पर्याय
‘व्हॅल्यू प्लस’ योजनेच्या माध्यमातून स्टार हेल्थने परवडणारे प्रीमियम आणि उच्च दर्जाचे आरोग्य संरक्षण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः लहान शहरांतील कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सुलभ आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यावर या योजनेचा भर आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी