
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) यांच्या ७४ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून वाटूळ गावातील प्रसिद्ध “डबलबारी भजन सम्राट” शिरी बुवा तथा श्रीधर शंकरराव चव्हाण भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार, दि. ३१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत स्वामी गगनगिरी महाराज मठ, वाटूळ तिठा, वाटूळ (ता. राजापूर) येथे होणार आहे.
स्पर्धेमध्ये विजेत्या पहिल्या तीन संघांना अनुक्रमे ₹७,०००, ₹५,००० आणि ₹३,००० अशी पारितोषिके तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज वादन, उत्कृष्ट चकवा वादक आणि उत्कृष्ट कोरस यांना प्रत्येकी रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या ८ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून सहभाग शुल्क ₹५०० निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक संघांनी २८ मेपूर्वी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भजन स्पर्धा प्रमुख महेश बामणे बुवा (९४०३६३८८९५), गणेश चव्हाण (९४२३४३१०९२), विराज चव्हाण (९९८७९५४९३७) आणि प्रमोद पवार (९८२१४७४०३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी