ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा एकदिवसीय संघ जाहीर
इस्लामाबाद , 22 मे (हिं.स.)।पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्याकडे सोपवण्यात आले आहे. या संघात अनेक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा एकदिवसीय संघ जाहीर


इस्लामाबाद , 22 मे (हिं.स.)।पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्याकडे सोपवण्यात आले आहे. या संघात अनेक मोठ्या खेळाडूंची पुनरागमन झाली आहे.

बाबर आझम, शादाब खान, नसीम शाह आणि हारिस रऊफ यांचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच सुफियान मुकीम याचेही पुनरागमन झाले आहे. तो बांगलादेशविरुद्धच्या मागील मालिकेचा भाग नव्हता.

दरम्यान, अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. रिझवानला संघात स्थान न देणे हा सर्वात धक्कादायक निर्णय मानला जात आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, त्यामुळे निवड समितीने या मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याच वर्षी मार्चमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत रिझवानचा समावेश होता. मात्र, त्या मालिकेत त्याला तीन डावांत केवळ 58 धावा करता आल्या होत्या.

त्याचवेळी फखर झमान आणि सैम अयूब यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही. हे दोन्ही खेळाडू सध्या पीसीबीच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पुनर्वसन प्रक्रियेत आहेत.

पाकिस्तानच्या संघात अशा तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, ज्यांनी अद्याप वनडे पदार्पण केलेले नाही. अहमद दानियाल, अराफात मिन्हास आणि रोहैल नझीर यांचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या तिघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. पीसीबीच्या माहितीनुसार, उस्मान खान आजारपणामुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

ऑस्ट्रेलियाचा संघ 23 मे रोजी पाकिस्तानमध्ये दाखल होणार आहे. पहिला वनडे सामना 30 मे रोजी रावळपिंडी येथे खेळवला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 2 आणि 4 जून रोजी लाहोर येथे होणार आहे. दोन्ही संघांदरम्यानची मागील वनडे मालिका 2024 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आली होती. त्या मालिकेत पाकिस्तानने 2-1 असा विजय मिळवला होता. तब्बल 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा हा पहिलाच वनडे मालिका विजय ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande