राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जतीन भोसलेला कांस्यपदक
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) । पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरीच्या अॅक्वाटेक्निक्स रत्नागिरी स्विमिंग क्लबचा जलतरणपटू जतीन किशोर भोसल
जतीन भोसले


रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) । पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरीच्या अॅक्वाटेक्निक्स रत्नागिरी स्विमिंग क्लबचा जलतरणपटू जतीन किशोर भोसले याने कांस्यपदक पटकावले.

जतीन भोसलेने १२ वर्षांखालील गटात ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कास्यपदक मिळविले. राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत त्याने पदक मिळविल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. उदयोन्मुख जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते.

जतीनने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. त्याच्या यशामागे प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande