टीसीएस प्रकरण : एआयएमआयएम नगरसेवकाची एसआयटीकडून चौकशी
नाशिक, 25 मे (हिं.स.) : बहुचर्चित टीसीएस आयटी कंपनीतील महिला सहकाऱ्यावर अत्याचार, लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर येथील एआयए
एफआईआर लोगो


नाशिक, 25 मे (हिं.स.) : बहुचर्चित टीसीएस आयटी कंपनीतील महिला सहकाऱ्यावर अत्याचार, लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर येथील एआयएमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन मजिद पटेल यांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) नाशिक येथे सोमवारी दिवसभर चौकशी करण्यात आली.

एसआयटीने दिलेल्या समन्सनुसार मतीन पटेल हे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आपल्या वकिलांसह चौकशीसाठी उपस्थित झाले. दुपारपासून सुरू झालेली ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरात आश्रय का आणि कसा देण्यात आला, यासंदर्भात मतीन पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच निदा खान आणि मतीन पटेल यांचे कोणत्याही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याबाबतही तपास यंत्रणांनी चौकशी केल्याचे समजते.

याशिवाय, माजी खासदार जलील खान यांनी निदा खानची किती वेळा भेट घेतली होती, यासंदर्भातील माहितीही एसआयटीने जाणून घेतल्याची चर्चा आहे. या चौकशीनंतर एसआयटीकडून मतीन पटेल यांच्याविरोधात पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तिने दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २६ मे) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी होणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असून, न्यायालय तिचा जामीन मंजूर करते की कोठडीतील मुक्काम वाढवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande