
कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत, खासगी बँका पिछाडीवर,जिल्हा बँक मात्र सुसाट
अमरावती, 25 मे (हिं.स.)।
अग्रणी बँकेमार्फत अमरावती जिल्ह्यासाठी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे मोठे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५२ हजार १८४ शेतकऱ्यांना एकूण ७५७ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. मात्र ११ राष्ट्रीयकृत व ७ वाणिज्य बँका कर्जवाटपात पिछाडीवर असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८८ हजार ६०० शेतकऱ्यांना १ हजार ६५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप - करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११ राष्ट्रर्शीयकृत बँका, ७वाणिज्य बैंका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या माध्यमातून १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी यासाठी बँकांनी प्रक्रिया गतिमान केली आहे. सध्यापर्यंत जिल्ह्यातील ५२ हजार १८४ शेतकऱ्यांना एकूण ७५७ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले असून, हे एकूण उद्दिष्टाच्या सुमारे ४६ टक्के इतके आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी ९ हजार जिल्हा बँक मात्र सुसाट पालकमंत्र्यांनी बँकांना दिला होता इशारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत कर्ज वाटप करावे. यामध्ये अनियमितता दिसून आली तर, बँकांवर कारवाई करण्यात येईल. वेळ पडल्यास शेतकऱ्यांनी गुन्हेही दखल करावे. याशिवाय बँकांचे पाणी, वीज, रस्ते बंद होईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा खरीप हंगाम बैठकीत दिला होता.
९५३ शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित केले आहे. त्यांची कामगिरी सुमारे २० टक्के इतकी आहे. ग्रामीण बँकांनी ५४७ शेतकऱ्यांना सुमारे ७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या बँकेमार्फत तब्बल ४१ हजार ६८४ शेतकऱ्यांना ५९५ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून, उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी ७६ टक्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक पाठबळ मिळाल्यास बियाणे, खत आणि मशागतीची कामे सुलभ होणार आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडून आघाडी घेणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी