मुलीच्या वडिलांसह २ महिला डॉक्टरांचा जामीन फेटाळला
बीड, 25 मे (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील एका अल्पवयीन भोळसर मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर, तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याप्रकरणी संशयित आणि पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही ती बाब लपवल्याप्रकरणी संशयित यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फे
मुलीच्या वडिलांसह २ महिला डॉक्टरांचा जामीन फेटाळला


बीड, 25 मे (हिं.स.)।

माजलगाव तालुक्यातील एका अल्पवयीन भोळसर मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर, तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याप्रकरणी संशयित आणि पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही ती बाब लपवल्याप्रकरणी संशयित यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. याच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या वडिलांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली होती. पोटदुखीमुळे सोनोग्राफी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलीचे वडील तिला घेऊन माजलगाव येथील हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्यांनी ही बाब पोलिस किंवा आरोग्य विभागाला कळवण्याऐवजी लपवून ठेवली. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही महिला डॉक्टर फरार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande