ओडिशा : सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 6 जणांचा मृत्यू, एक गंभीर
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत भुवनेश्वर, 26 मे (हिं.स.)। ओडिशाच्या कलाहांडी जिल्ह्यातील मदनपूर रामपूर क्षेत्राअंतर्गत गौड कार्लाखुंटा गावात मंगळवारी एका दुर्दैवी दुर्घटनेत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला, तर आ
Odisha  Six Dead  Suffocating Septic Tank Kalahandi


मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत

भुवनेश्वर, 26 मे (हिं.स.)। ओडिशाच्या कलाहांडी जिल्ह्यातील मदनपूर रामपूर क्षेत्राअंतर्गत गौड कार्लाखुंटा गावात मंगळवारी एका दुर्दैवी दुर्घटनेत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये निमाई चरण पाल (वडील गंगाधर पाल), आकाश पाल (वडील निमाई चरण पाल), आदल माझी (वडील विष्णु माझी), बैकुंठ जाल (वडील मधु जाल), मनोरंजन हाथी (वडील धनसागर हाथी) आणि छांद जाल (वडील बलदेव जाल) यांचा समावेश आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या सेप्टिक टँकमधील सेंट्रिंगचे ढांचे काढण्यासाठी काही मजूर टँकमध्ये उतरले होते. याच दरम्यान टँकमध्ये विषारी वायू साचल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने ते बेशुद्ध पडले, त्यांना वाचवण्यासाठी एकामागून एक इतर काही जण टँकमध्ये उतरले, मात्र त्यांनाही गुदमरल्याने शुद्ध हरपली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले आणि सर्वांना टँकमधून बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना तातडीने मदनपूर रामपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मदनपूर रामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत

कलाहांडी जिल्ह्यातील मदनपूर रामपूर भागात बांधकामस्थळी झालेल्या या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक मृताच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. राज्य सरकार प्रभावित कुटुंबियांसोबत ठामपणे उभी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande