नीट पेपरफुटी प्रकरणात सरकार जबाबदारी टाळतंय : काँग्रेस
नवी दिल्ली, ३० मे (हिं.स.)नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. खेरा म्हणाले की, सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सर्व
काँग्रेसच माध्यम विभाग प्रमुख पवन खेरा


नवी दिल्ली, ३० मे (हिं.स.)नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. खेरा म्हणाले की, सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सर्वोच्च न्यायालयाला सरकारला सांगावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे.

खेरा यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, सरकार जबाबदारी टाळत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा दावा करून परिस्थितीची थट्टा करत आहे. लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे आणि कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. शिक्षणमंत्री जबाबदार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता हवाई दल प्रश्नपत्रिका घेणार असल्याचे म्हटले जात आहे, तर पुन्हा प्रश्नपत्रिका फुटल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना जबाबदार धरले जाईल का?

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात म्हटले होते की, जोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (NTA) विचारले की, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेतो, पण तिथे कधीही पेपरफुटी झालेली नाही. NTA ने त्यांच्याकडून धडा घ्यायला हवा. नीट-यूजी (NEET-UG) परीक्षा ३ मे रोजी देशभरात घेण्यात आली. ७ मे रोजी संध्याकाळी पेपरफुटीची घटना समोर आली. यानंतर, १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली. आता, ही परीक्षा २१ जून रोजी पुन्हा आयोजित केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande