प्रेमसंबंधांच्या बहाण्याने अत्याचार, धमकीही; महाड पोलिसांत तक्रार
रायगड, 31 मे (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड येथील एका महिलेची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने तिच्
Abuse and threats on the pretext of love affair; Complaint to Mahad police


रायगड, 31 मे (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड येथील एका महिलेची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने प्रेम असल्याचे भासवून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलेची फसवणूक करून तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(एम), ६९ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडेकर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande