
कोल्हापूर, 31 मे (हिं.स.)। लहान बालकांना घेऊन आलेल्या पालकांच्या भिरभिरणाऱ्या नजरा...मनात काहूर... माझ्या मुलाची योग्य शस्त्रक्रिया होईल का? असे अनेक प्रश्न मनात बाळगून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांना आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक आशेचा किरण मिळाला.... दिवसभरात झालेल्या हृदय तपासणीतून पालकांना मोठा दिलासा मिळाला. 225 बाल रुग्णांची तपासणी झाली. त्यात मधील 32 बालकांना हृदयाला छिद्र तसेच हृदयाचा त्रास असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
डॉ. राहुल सराफ, Coneultant Pediatric Cardiologist
डॉ. अभिजित नाईक, Consultant Pediatric Cardiac Surgeon
यांनी बालकांची तपासणी करून पालकांना योग्य मार्गदर्शन केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुर मध्ये आयोजित लहान मुलांच्या हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.
ह्या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शिबिरार्थींशी संवाद साधला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची माहिती दिली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.
शिबिराचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय बलुगडे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar