भातकुली पंचायत समितीत महिला परिचारिकेवर जीवघेणा हल्ला; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण
अमरावती, 04 मे (हिं.स.) अमरावतीच्या भातकुली पंचायत समिती परिसरात एका महिला कर्मचारी परिचारिकेवर काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय आरोपीने महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून तिला जीवे मारण्याचा प्रय
भातकुली पंचायत समितीत महिला परिचारिकेवर जीवघेणा हल्ला;  कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण...


अमरावती, 04 मे (हिं.स.)

अमरावतीच्या भातकुली पंचायत समिती परिसरात एका महिला कर्मचारी परिचारिकेवर काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय आरोपीने महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.या हल्ल्यात प्रणाली लबडे ही महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,घटनेनंतर पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande