सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी
पुणे, 04 मे (हिं.स.) - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी केली आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्
Pawae nreksd


पुणे, 04 मे (हिं.स.) - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी केली आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावाने आज झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल १ लाख ८९ हजार मतांची आघाडी मिळवत विजय संपादीत केला. २०१९ मध्ये अजित पवार यांना मिळालेल्या १ लाख ६५ हजार मताधिक्याला त्यांनी मागे टाकले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ लाट नसून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहोर आहे.

बारामती मतदारसंघातील यापूर्वीची निवडणूक आकडेवारी पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी ७० टक्के मतदानात १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळवत १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम केला होता. त्याआधी २०१४ मध्ये त्यांनी १ लाख ५० हजार ५८८ मते मिळवत ८९ हजार ७९१ मताधिक्य मिळवले होते, तर २००९ मध्ये ६८ टक्के मतदानात १ लाख २८ हजार ५४४ मते मिळवत १ लाख २ हजार ७९७ मताधिक्य नोंदवले होते.

२०२४ मधील परिस्थितीतही बारामतीत मोठे मतदान झाले होते. त्या वेळी ७१.८६ टक्के मतदानाची नोंद झाली असून अजित पवार यांनी १ लाख ८१ हजार १३२ मते मिळवत १ लाख १ हजार मताधिक्याने विजय मिळवला होता.या निवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी किमान १ लाख २३ हजार २६५ मते आवश्यक असताना, सुनेत्रा पवार यांनी हा टप्पा सहज पार करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

 
बारामतीकरांनी दादांवरचा अढळ विश्वास माझ्या पाठीमागे उभा केला - सुनेत्रा पवार 
 
या विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, "माझी ही पहिली निवडणूक आहे, मला कधीही असं वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकीला समोरं जावं लागेल. मन खरंतर खूप भरून येतंय. दादांनी केलेल्या विकासकामांना आज बारामतीकरांनी या विजयाच्या रुपात श्रद्धांजली वाहिली आहे. बारामतीकरांनी दादांवरचा अढळ विश्वास माझ्या पाठीमागे उभा केला आहे. त्यासाठी मी तमाम बारामतीकरांचे आभार मानते. हा विश्वास नक्कीच सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन. या विजयानंतर माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे असे मी समजते. संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे, अजित दादांनी पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण करेन."
 

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande