केरळममध्ये सत्तांतर-भाजपचं खातं उघडलं; पुदुच्चेरीत भाजप आघाडीचीच पुन्हा सत्ता
तिरुअनंतपुरम / पुदुच्चेरी, 04 मे (हिं.स.) - केरळममध्ये मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला केरळमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफ सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत
kerala puducherry


तिरुअनंतपुरम / पुदुच्चेरी, 04 मे (हिं.स.) - केरळममध्ये मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला केरळमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफ सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एलडीएफ 35, युडीएफ 102 आणि एनडीए 3, असे आमदार निवडून आल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा 71 आहे. त्यामुळे युडीएफचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे पुदुच्चेरीत एनडीए 18, काँग्रेस प्रणित 6 आणि इतर 6 असे आमदार निवडणूक आले आहेत. बहुमतासाठी आवश्यक आकडा 16 आहे. त्यामुळे एनडीएचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एक आघाडी सत्ताधारी ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) असून त्यात भाजप सहभागी आहे. तर प्रतिस्पर्धी दुसरी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स आहे, ज्यात द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) भागीदार आहे.

बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता प्राप्त केल्यानंतर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले खाते उघडले आहे. बी. बी. गोपाकुमार यांनी कोल्लम जिल्ह्यातील चथनूर मतदारसंघात सीपीआयचे आर. राजेंद्रन यांचा 4,002 मतांनी पराभव करून विजय मिळवला. 2021 मध्ये याच जागेवर डाव्या पक्षाने 17 हजार मतांनी विजय खेचून आणला होता. गोपकुमार यांना 50 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. काँग्रेस उमेदवार सूरज रवि तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आम आदमी पक्षाच्या अरुण यांना केवल 613 मते मिळाली. नेमम जागेवरही भाजप उमेदवार राजीव चंद्रशेखर आघाडीवर आहेत. ते सुद्धा विजय प्राप्त करतात का याची उत्सुकता असेल.

दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) सत्ता स्थापन केली होती. अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे संस्थापक एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपसोबत आघाडीमध्ये हे सरकार स्थापन झाले होते. आता, यंदाही येथे सत्तेकडे वाटचाल केल्याचं दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande