भरधाव दुचाकीचा अपघात; चालकाचा मृत्यू
रायगड, 05 मे (हिं.स.)। : म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत मेेंदडी कोंड गावाजवळील पुलावरील वळणावर भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानवली (ता. श्
Speeding two-wheeler accident; driver dies


रायगड, 05 मे (हिं.स.)। : म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत मेेंदडी कोंड गावाजवळील पुलावरील वळणावर भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानवली (ता. श्रीवर्धन) येथील आरोपी करलास येथे लग्न समारंभ आटोपून आपल्या मामीला मुंबईला जाण्यासाठी म्हसळा बसस्थानकावर सोडण्यासाठी एफ.झेड कंपनीची दुचाकी (क्र. एमएच ५८ ए ८८१६) घेऊन दिघी-म्हसळा मार्गाने येत होता. मेेंदडी कोंड गावाच्या हद्दीतील पुलाजवळील वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातातील दुखापतीमुळे चालकाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(बी), १२५(ओ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ. म्हात्रे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande