सीट बेल्ट ठरला जीवनरक्षक; निलंगा तालुक्यातील अपघातातून धडा”
लातूर, 06 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडलेल्या एका रस्ते अपघाताच्या घटनेत सीट बेल्टच्या वापरामुळे जीवितहानी टळल्याची महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. मारुती लिंबाजी सूर्यवंशी (वय 29 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. माकणी थोर, ता. निलंगा,
सीट बेल्ट


लातूर, 06 मे (हिं.स.)।

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडलेल्या एका रस्ते अपघाताच्या घटनेत सीट बेल्टच्या वापरामुळे जीवितहानी टळल्याची महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे.

मारुती लिंबाजी सूर्यवंशी (वय 29 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. माकणी थोर, ता. निलंगा, जि. लातूर) हे आपल्या कुटुंबासह कोल्हापूर येथून देवदर्शन करून गावी परत येत असताना, बोरफळ गावाजवळ आले असता पवन मधुकर सूर्यवंशी (वय 37 वर्षे, रा. माकणी थोर, ता. निलंगा) याने त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी इको (MH-24 BX 1979) हे चारचाकी वाहन निष्काळजीपणे व वेगाने चालवून पुढे चाललेल्या ट्रॅव्हल्स वाहनास पाठीमागून जोराची धडक दिली.

सदर धडकेमुळे संबंधित वाहनाने दोन वेळा पलटी घेतली असून अपघाताचे स्वरूप गंभीर होते. तथापि, वाहनातील फिर्यादी व चालक यांनी सीट बेल्टचा वापर केलेला असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर काही जणांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. केवळ सीट बेल्टचा वापर केल्यानेच भीषण अपघात होऊनही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

लातूर जिल्हा पोलीस यांचे नागरिकांना आवाहन.

सदर घटनेच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की,

👉🏻चारचाकी वाहनधारकांसाठी:

वाहन चालविताना व बसताना समोरील तसेच मागील सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे.

👉🏻सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे.

👉🏻वेगमर्यादेचे पालन करून

निष्काळजीपणा व बेदरकारपणे वाहन चालविणे टाळावे

👉🏻दुचाकी वाहनधारकांसाठी

ISI प्रमाणित हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे.

👉🏻चालकासह मागील प्रवाशानेही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.

“रस्ते अपघात हे अचानक घडणारे असले तरी, त्यातून होणारी हानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सीट बेल्ट व हेल्मेट हे केवळ नियम नसून जीवनरक्षक साधने आहेत.”

सदर अपघातातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की,

👉 “सीट बेल्ट लावा – जीव वाचवा”

👉 “हेल्मेट वापरा – सुरक्षित राहा”

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande