राज्य लॅक्रोस स्पर्धेसाठी नाशिकचा संघ घोषित, राज्य स्पर्धेसाठी परभणी येथे रवाना
नाशिक, 07 मे (हिं.स.)। - शेलु, परभणी येथे ४ थ्या महाराष्ट्र राज्य लॅक्रोस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या संघांची काल अंतिम निवड करण्यात आली आहे. दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्हा संघांची
Nashik team announced for


नाशिक, 07 मे (हिं.स.)।

- शेलु, परभणी येथे ४ थ्या महाराष्ट्र राज्य लॅक्रोस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या संघांची काल अंतिम निवड करण्यात आली आहे. दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्हा संघांची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून १८ पुरुष आणि १८ महिलांची प्राथमिक निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या खेळाडूंचे दिनांक २९ एप्रिल ते ५ मे पर्यंत सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामधून अंतिम १२ पुरुष आणि १२ महिलांची निवड करण्यात आली आहे. हे निवड झालेले खेळाडू राज्य स्पर्धामध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.हे नाशिक जिल्ह्याचे संघ आज राज्य स्पर्धेसाठी नाशिक येथून रवाना झाले. या संघांना नाशिक मनपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी, सौ. सरिता सोनवणे, सौ. मोनिका हिरे, सागर लामखडे, आई फाउंडेशनचे शंकर हिरे यांनी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर संघाला लॅक्रोस असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष मुकुंद झनकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे आदींनी शुभेच्छा दिल्या. खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांच्या प्रशिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.

निवड झालेल्या खेळाडूंखालील प्रमाणे

महिला संघामध्ये : -श्रद्धा कापसे. वर्षा कोळी, अनुष्का घोलप, शर्मिन शेख, पायल नाईकवाडे, मयुरी जगताप, तेजश्री थेटे, रोशनी नंदन, आनंदी लहाने, माही चक्रवर्ती, मृण्मयी झनकर, निकिता जगताप.

संघ मार्गदर्शक: दीपक निकम, संघ व्यवस्थापक: हिना शेख

पुरुष संघामध्ये - आर्यन दराडे,

मनीष प्रजापती, योगेश गवळी, हेमंत गवळी, क्षितिज शिंदे, अभयकुमार प्रसाद, लक्ष्मण राठोड, अमित कदम, संदेश राठोड, शैलेंद्रपाल सिंग, प्रदीप डोंगरे, शुभम पैठणे संघ व्यवस्थापक: शशीभूषण सिंग, संघ मार्गदर्शक: अविनाश वाघ

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande