भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न
मुंबई, 07 मे (हिं.स.)भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव वडील झाला आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टीने एका मुलीला जन्म दिला आहे. सूर्यकुमार सध्या आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा सामना रविवारी रायपूरमध्ये रॉयल चॅ
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी दिविशा यांचा संग्रहित फोटो


मुंबई, 07 मे (हिं.स.)भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव वडील झाला आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टीने एका मुलीला जन्म दिला आहे. सूर्यकुमार सध्या आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा सामना रविवारी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाशी होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या हंगामात त्याची मैदानातील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी, या आनंदाच्या बातमीने त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. एके काळी जगातील सर्वात धोकादायक टी-२० फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवला सध्याच्या आयपीएल हंगामात लय सापडलेली नाही. त्याने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये केवळ १९.५० च्या सरासरीने १९५ धावा केल्या आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे.

सूर्यकुमार यादवने नुकतेच मुंबई इंडियन्सला लखनऊविरुद्ध विजय मिळवून दिला होता. लखनऊविरुद्धच्या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने, सूर्यकुमारने त्याच्या जागी कर्णधारपद भूषवले. सूर्यकुमारचे कर्णधारपद मुंबईसाठी भाग्यवान ठरले, कारण सलग तीन पराभवांनंतर संघाला विजयाची चव चाखायला मिळाली होती. १० मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध होणाऱ्या सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्चित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande