
म्युनिक, ७ मे (हिं.स.) - गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात बायर्न म्युनिकविरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत सोडवल्यानंतर, एकूण ६-५ अशा आघाडीसह युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
लुईस एनरिके यांच्या संघाने, ज्यांनी गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये झालेल्या रोमांचक पहिल्या टप्प्यात ५-४ अशी आघाडी घेतली होती, या सामन्यातही सुरुवातीलाच आघाडी घेतली. उस्मान डेम्बेलेने सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांतच गोल करून पीएसजीची एकूण आघाडी आणखी मजबूत केली.हॅरी केनने अतिरिक्त वेळेत बायर्न म्युनिचसाठी गोल केला. सामपणना अतिरिक्त वेळेत नेण्यासाठी आवश्यक असलेला दुसरा गोल करण्यात जर्मन क्लब अपयशी ठरला.
पहिल्या हाफमध्ये पंचांच्या अनेक निर्णयांवरून बायर्न म्युनिक संग नाराज दिसत होता. पण त्यांना बऱ्याच काळासाठी स्पष्ट संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला ख्विचा क्वारात्स्खेलियाच्या पासवर डेम्बेलेने एक शानदार शॉट मारून गोलजाळ्यात चेंडू टाकला आणि पीएसजीने आपली एकूण आघाडी दुप्पट केली. दुसऱ्या हाफमध्ये, मॅन्युएल न्युअरने ख्विचा क्वारात्स्खेलिया आणि डेझायर डोए यांचे शॉट्स वाचवून बायर्नच्या आशा जिवंत ठेवल्या.अतिरिक्त वेळेच्या चौथ्या मिनिटाला, हॅरी केनने स्पर्धेतील आपला १४वा गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि पीएसजीने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.
पीएसजी आता ३० मे रोजी बुडापेस्ट येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रीमियर लीगमध्ये अग्रस्थानी असलेल्या आर्सेनलचा सामना करेल. अॅलिआन्झ अॅरिना हे तेच ठिकाण आहे जिथे पीएसजीने गेल्या वर्षी इंटर मिलानला पराभूत करत आपले पहिले चॅम्पियन्स लीग विजेतेपद पटकावले होते. फ्रेंच चॅम्पियन पीएसजी आता १९९० नंतर सलग दोनदा चॅम्पियन्स लीग जिंकणारा दुसरा संघ बनण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, रिअल माद्रिदने हा पराक्रम केला होता. सहा वेळा युरोपियन चॅम्पियन राहिलेल्या बायर्न म्युनिचला २०२० मध्ये लिस्बन येथे विजेतेपद जिंकल्यापासून अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे