बॉबी देओलच्या 'बंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मुंबई, 7 मे, (हिं.स.)। बॉबी देओल आणि अनुराग कश्यप यांच्या बहुप्रतिक्षित ''बंदर'' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हाय-व्होल्टेज ड्रामा आणि नातेसंबंधांच्या कथेवर आधारित या चित्रपटात बॉबी पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. या चित्रपटात बॉबीसो
बॉबी देओलच्या 'बंदर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.


मुंबई, 7 मे, (हिं.स.)। बॉबी देओल आणि अनुराग कश्यप यांच्या बहुप्रतिक्षित 'बंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हाय-व्होल्टेज ड्रामा आणि नातेसंबंधांच्या कथेवर आधारित या चित्रपटात बॉबी पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे.

या चित्रपटात बॉबीसोबत सान्या मल्होत्रा, राज बी. शेट्टी, सपना पब्बी, सबा आझाद, रिद्धी सेन, जितेंद्र जोशी, इंद्रजीत आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टीझरची सुरुवात हलक्या सुरात होते, परंतु हळूहळू कथा एक रहस्यमय आणि तीव्र वळण घेते. हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे.

पाताल लोक, कोहरा आणि उडता पंजाब सारख्या प्रशंसनीय प्रकल्पांसाठी ओळखले जाणारे सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी बंदर लिहिले आहे. झी स्टुडिओच्या सहकार्याने निखिल द्विवेदीच्या सॅफ्रॉन मॅजिकवर्क्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande