अमरावती - नयना गुंडे यांच्याकडून विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे कौतुक
अमरावती, 13 जून, (हिं.स.) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला अमरावती महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सेंटरमधील विविध स्टार्टअप उपक्रमांची बारकाईने पाहणी केली आणि युवा उ
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे कौतुक:प्रभावीपणे राबवणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले


अमरावती, 13 जून, (हिं.स.) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला अमरावती महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सेंटरमधील विविध स्टार्टअप उपक्रमांची बारकाईने पाहणी केली आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

याप्रसंगी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द.ल. ठाकरे, उपविभागीय आयुक्त संजय जाधव, विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे आणि इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख तथा संचालक प्रा.स्वाती शेरेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. विभागीय आयुक्तांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. सेंटरमध्ये नवउद्योजकांची होणारी निवड प्रक्रिया, त्यांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच आर्थिक व तांत्रिक सहाय्याविषयी त्यांनी जाणून घेतले. स्टार्टअप्सच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी भविष्यातील संधी, विस्ताराच्या शक्यता आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनें’तर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते रुजू आदेशांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ यावेळी ठरले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेत वाढ करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

समन्वय अधिक दृढ होण्यास मदत स्टार्टअप परिसंस्थेला मिळाले बळ इन्क्युबेशन सेंटरच्या दर्जेदार कार्यामुळे प्रांतातील उद्योजकता, कौशल्य विकास आणि स्टार्टअप परिसंस्थेला अधिक बळ मिळेल. अशा भेटींमुळे उद्योग, शिक्षण आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल.

नयना गुंडे, विभागीय आयुक्त, अमरावती

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande