रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचा नैतिक पाठिंबा
सोलापूर, 13 जून (हिं.स.)पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी आमदार रोहित पवार यांच्या सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविला. या
gfd


सोलापूर, 13 जून (हिं.स.)पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी आमदार रोहित पवार यांच्या सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविला. या भेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले, विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्या विश्वस्तांनी आंदोलनस्थळी दिलेली भेट म्हणजे विठुरायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे द्योतक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलनाला विविध भागांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक आमदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत. राज्यभरातून मिळत असलेल्या वाढत्या समर्थनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांची उपस्थिती लक्षणीय असून आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande