नगरसेवकाशी गैरवर्तन प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक लेखापालाचे निलंबन
विजबिल माहिती विचारणाऱ्या नगरसेवकाला शिवीगाळ केल्याचा आरोप; ध्वनिफितीच्या आधारे कारवाई अमरावती, 13 जून (हिं.स.)। महावितरणच्या B&R शहर उपविभागातील सहाय्यक लेखापाल श्री शिवचरण बालम भोसले यांना नगरसेवकाशी कथित गैरवर्तन आणि अर्वाच्य भाषेचा वापर क
नगरसेवकाशी गैरवर्तन प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक लेखापालाचे निलंबन


विजबिल माहिती विचारणाऱ्या नगरसेवकाला शिवीगाळ केल्याचा आरोप; ध्वनिफितीच्या आधारे कारवाई

अमरावती, 13 जून (हिं.स.)।

महावितरणच्या B&R शहर उपविभागातील सहाय्यक लेखापाल श्री शिवचरण बालम भोसले यांना नगरसेवकाशी कथित गैरवर्तन आणि अर्वाच्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता तथा सक्षम अधिकारी राजेश घाटोळे यांनी हा आदेश जारी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भोसले हे ५ जुलै २०२३ पासून शहर उपविभागात कार्यरत आहेत. १० जून २०२६ रोजी सकाळी नगरसेवक संजय रामकृष्ण गव्हाळे यांनी विजबिलासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी भोसले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. यावेळी भोसले यांनी उद्धटपणे वर्तन करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली. या संभाषणाची ध्वनिफीतही संबंधितांनी कार्यालयात सादर केली आहे.महावितरण प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत, संबंधित कर्मचाऱ्याचे वर्तन कंपनीच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणारे असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी सेवाविनियम-२००५ मधील तरतुदींनुसार हे कृत्य गंभीर स्वरूपाचे मानण्यात आले असून सेवाविनियम क्रमांक ८८(क) अंतर्गत भोसले यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.निलंबन काळात त्यांना आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी B&R शहर उपविभाग क्र.१ कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच मूळ वेतनाच्या २० टक्के प्रमाणे निलंबन भत्ता व नियमानुसार इतर भत्ते मिळणार असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande