
अमरावती, 13 जून (हिं.स.)
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी रात्री आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्या शंकरनगर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. याआधी गुरुवारी भाजपचे विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आ.राणांच्या कार्यालयात भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बावनकुळे यांनी आ. राणांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी आ. रवी राणा, नवनीत राणा व सुनील राणा यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे, आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा व सुनील राणा यांची दहा ते पंधरा मिनिटे बंद दरवाजात चर्चा झाली.त्यानंतर स्वाभिमानीच्या नगरसेवकांचा ओळख परिचय करण्यात आला. यावेळी आ. प्रवीण तायडे, भाजपा नगरसेवक ऋ षिकेश देशमुख, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती अॅड. प्रिती रेवण आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी