
अमरावती, 14 जून (हिं.स.)। अचलपूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ४४ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदस्य पदाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कांडली, रासेगाव, खैरी, परसापूर, पथ्रोट, येसूर्णा, नारायणपूर, धोतरखेडा, अंबाडा कंडारी, टवलार, खेलदेवमाळी, कविठा बुद्रूक, दर्याबाद, धामणगावगडी, एकलासपूर, भुगाव, घोडगाव, हनवतखेडा, मल्हारा, निमकुंड, सालेपूर, गौरखेडा, खांजमानगर, निंभारी, कोल्हा, येवता, खरपी, कुष्ठा बुद्रूक, नायगाव, निजामपूर, शिंदी बुद्रूक, बोपापूर, बोरगावदोरी, वडनेर भुजंग, बोर्डी, म्हसोना, वडगाव फत्तेपूर, हरम, सावळापूर, इसापूर, पांढरी, चौसाळा, बोरगावपेठ आदी ४४ ग्रामपंचायत सदस्यपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. अध्यासी अधिकारी म्हणून राजेश व्यवहारे, कैलास गुळसुंदरे, अमोल बोकडे, श्री. जयस्वाल, प्रवीण कावलकर, वाय. आर. रेवस्कर, आकाश कथे, राजू सोळंके, रविकांत उईके, अजय उमक, शीतल दहातोंडे, श्री. पवार, अमर खाडे, उमेश गुल्हाने, माधुरी कराडे, राजाराम उके, महादेव कास्देकर, राम चौधरी, कुणाल डोंगरे, नीलेश बेराड, विनोद तट्टे, रोहीत गावंडे, प्रथमेश सुरंजे, सुरेंद्र तायडे, सूरज शेंडे, संजय भगत, राजेंद्र मेतकर, सुखदेव बनसोड, रवींद्र बेठेकर आदींनी काम पाहिले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी