
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या शनिवारी, दि. 20 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हॉटेल विवेक येथे सायंकाळी ५ वाजता हा समारंभ सुरू होईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी गुणपत्रकांची झेरॉक्स क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. इयत्ता दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
गेल्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला ८५ टक्के अथवा अधिक गुण तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारीप्रमाणे) मिळाले आहेत, अशा रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत सोमवार, दि. 17 जूनपर्यंत सकाळी 11.00 ते संध्या 5.00 या वेळेत (रविवार व शासकीय सुट्या सोडून) क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयात बेसमेंट स्टोअर क्र. 3, बी विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी येथे आणून द्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी