'तिघी' चित्रपटाचे शनिवारी मुंबईत विशेष प्रदर्शन
* दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम मुंबई, 19 जून (हिं.स.) : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने बहुचर्चित ‘तिघी’ या चित्रपटाचे विशेष
'तिघी' चित्रपटाचे शनिवारी मुंबईत विशेष प्रदर्शन


* दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम

मुंबई, 19 जून (हिं.स.) : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने बहुचर्चित ‘तिघी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि.२० जून २०२६ रोजी, दुपारी १.०० वाजता , पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात आयोजित करण्यात आले असून, चित्रपटप्रेमींना या चित्रपटाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

या विशेष प्रदर्शनाला प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे , दिग्दर्शक जिजीविषा काळे उपस्थित राहणार आहेत. चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या आशय, निर्मिती प्रक्रिया आणि सामाजिक संदर्भांवर उपस्थितांशी संवाद साधला जाणार आहे.

‘तिघी’ हा चित्रपट स्त्रीजीवनातील विविध पैलूंवर भाष्य करणारा असून, त्याच्या प्रभावी कथानक, संवेदनशील मांडणी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षक व समीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना दर्जेदार सिनेमाचा अनुभव घेण्याबरोबरच कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट रसास्वाद मंडळाने सर्व चित्रपटप्रेमींना या विशेष प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande