
अमरावती, 19 जून (हिं.स.)
विदर्भाची पंढरी आई रूख्मीणी मातेचे माहेर अशा प्राचीन पुरातन तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर श्री विठ्ठल रूख्मीणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी पंढरपूर यात्राकरिता १९ जून २०२६ श्रीतिर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री तिर्थक्षेत्र पंढरपूर करिता पायदळ पालखी सोहळा प्रस्थान होईल.सन १५९४ पासून पंढरपूरला महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ दिडी व जाणारी विदर्भाची एकमेव मानाची पालखी निज जेष्ठ शुक्ल ५ पंचमी शुक्रवार १९ जून २०२६ ला प्रस्थान होणार आहे. तरी पंचक्रोशीतील वारकरी भाविक भक्तांच्या हजारोच्या उपस्थितीत प्रस्थान होईल. करिता श्री तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री तिर्थक्षेत्र पंढरपूर या पायदळ पालखी सोहळा करिता उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष / विश्वस्त मंडळ श्री. विठ्ठल रुख्मीणी संस्थान श्री तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर (विदर्भ) यांनी केले आहे.--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी