
लातूर, 02 जून (हिं.स.) : लातूरपासून जवळच औसा रोडवर खोपेगाव शिवारात असलेल्या सैलानीबाबा दरबारात लोकांना अंगारा लावून यंत्र देऊन, पेट्या बांधून रोग बरा करतो म्हणून जादूटोणा, भोंदुगिरी केल्या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांत एका व्यक्तीच्या विरोधात महाराष्ट्र
नरबळी, इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक उच्चाटन व अध्यादेश २०१३ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैलानीबाबा दरबार, खोपेगाव येथे मारोती चंदरराव मोरे रा. खोपेगाव हे लोकांना अंगारा लावून, यंत्र देऊन, पेट्या बांधून, रोग बरा करतो म्हणून भोंदुगिरी करून लोकांना अनिष्ट प्रथा, जादूटोणा करत असल्याचे निष्पन्न झालेवरून स्वतः लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या फिर्यादीवरून लातूरग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या भोंदुबाबा विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्यास अटक केली का? याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis