बिहार : फेजल खानच्या कोचिंगला पुन्हा फायर सेफ्टी नोटीस; १० दिवसांत त्रुटी दूर करण्याचे आदेश
पाटणा , 23 जून (हिं.स.)। खान सरांच्या पाटण्यातील बोरिंग रोड परिसरातील खान ग्लोबल स्टडीज या कोचिंग संस्थेची अग्निसुरक्षा विभागाने पुन्हा तपासणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. विभागाने संस्थेला पुन्हा नोटीस बजावत १० दिवसांच्या आत सर्व
खान सरांच्या कोचिंगला पुन्हा फायर सेफ्टी नोटीस; १० दिवसांत त्रुटी दूर करण्याचे आदेश


पाटणा , 23 जून (हिं.स.)। खान सरांच्या पाटण्यातील बोरिंग रोड परिसरातील खान ग्लोबल स्टडीज या कोचिंग संस्थेची अग्निसुरक्षा विभागाने पुन्हा तपासणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. विभागाने संस्थेला पुन्हा नोटीस बजावत १० दिवसांच्या आत सर्व उणिवा दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या १५ दिवसांत या कोचिंग संस्थेला दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.

अग्निसुरक्षा पथकाच्या तपासणीत संस्थेमध्ये अद्याप अनेक आवश्यक सुरक्षा निकषांचे पालन होत नसल्याचे समोर आले. प्रमुख त्रुटींमध्ये पुरेशा आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांचा अभाव,फायर अलार्म प्रणालीतील त्रुटी,स्प्रिंकलर यंत्रणेचा अभाव, आपत्कालीन जिन्याचे (फायर स्टेअर) अपूर्ण बांधकाम, फायर डिटेक्टर प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित नसणे, विद्युत पॅनलखाली बसण्याची व्यवस्था या बाबींचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान अग्निशमन विभागाचे डीआयजी मनोज कुमार नट यांनी सांगितले की, विद्युत पॅनलखाली करण्यात आलेली बसण्याची व्यवस्था सुरक्षा निकषांनुसार योग्य नाही. तसेच इमारतीत स्प्रिंकलर प्रणाली आढळून आली नाही, ज्यामुळे आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, संस्थेला सर्व त्रुटी दूर करण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत आवश्यक सुधारणा न केल्यास नियमांनुसार कारवाई केली जाईल. गरज भासल्यास कोचिंग सेंटरला सील करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.

याशिवाय अग्निशमन विभागाने पाटण्यातील अनेक कोचिंग संस्थांचे ऑडिट केले असून, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या जवळपास सर्व संस्थांमध्ये काही ना काही प्रमाणात अग्निसुरक्षेशी संबंधित त्रुटी आढळल्या आहेत. अलीकडेच लखनौमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातील कोचिंग संस्था आणि शैक्षणिक इमारतींच्या अग्निसुरक्षेची तपासणी अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत पाटण्यातही व्यापक ऑडिट सुरू आहे.

सध्या कोचिंग संस्था बंद करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र, विभागाने स्पष्ट संकेत दिले आहेत की, पुढील १० दिवसांत सुरक्षा निकषांनुसार आवश्यक सुधारणा न केल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते. त्यामध्ये संस्थेला सील करण्याचाही समावेश असू शकतो. त्यामुळे विभागाची पुढील तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande